ऐन मतदानाच्या दिवशी किरण सामंत नॉट रिचेबल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ऐन मतदानाच्या दिवशी किरण सामंत नॉट रिचेबल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
img
Dipali Ghadwaje
देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. कोकणात आज मतदान होत असताचा रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरणारे आहे. 

सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. सकाळपासून किरण सामंत यांचा फोन नॉटरीचेबल असल्याचे समजतेय. कार्यकर्ते किरण सामंत यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. किरण सामंत हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान राज्यातील 11 मतदारसंघात आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात बारामती, सोलापुर, माढा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आज मतदान होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे विरुद्ध राऊत असा सामना होत आहे. कोकणात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group