ठरलं ! छत्रपती संभाजी नगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी
ठरलं ! छत्रपती संभाजी नगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी
img
Dipali Ghadwaje
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली आहे.त्यानुसार, शिवसेनेनं मंत्री संदीपान भुमरेंना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार असून चंद्रकांता खैरे विरुद्ध संदीपान भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत होणार आहे.    

छत्रपती संभाजी नगरसाठी शिवसेनेकडून कोण उमेदवार असेल, याचे तर्क लढवले जात होते. ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी घोषित केल्याने त्यांना लढत देणारा उमेदवार शिवसेनेने जाहीर केला आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे हे शिवसेनेकडून लोकसभेच्या आखाड्यात असतील. संभाजी नगर हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. परंतु २०१९ मध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. तिथे एमआयएमचे इम्तियाज जलील याचा विजय झाला होता.

यावेळी ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे इच्छूक होते. त्यांनी जाहीरपणे तशी मागणीदेखील केली होती. दुसरीकडे खैरेही इच्छूक होते. पक्षाने खैरेंना मैदानात उतरवलं. तरीही दानवेंनी नाराजी व्यक्त केली नाही. त्यानंतर खैरेंनी ही शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलं.

 शिवसेनेने शनिवारी मंत्री संदीपान भूमरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे शिवसेना, ठाकरे गट, एमआयएम अशी तिरंगी लढत छत्रपती संभाजी नगरमध्ये बघायला मिळेल.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group