मोठी बातमी! सुनील तटकरेंसह रायगडमधील 'या' ४ उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा ; 'हे' कारण आले समोर ?
मोठी बातमी! सुनील तटकरेंसह रायगडमधील 'या' ४ उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा ; 'हे' कारण आले समोर ?
img
Dipali Ghadwaje
देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाची उमेदवारांच्या खर्चावर विशेष नजर असते. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून नेमका किती पैसा खर्च केला जातो, यावर निर्णय अधिकारी लक्ष ठेवून असतात. उमेदवारांना विविध बाबींवर खर्च करण्याच्या रकमेची मर्यादा निश्चित करुन दिलेली असते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

निवडणूक खर्चाची नोंद अपूर्ण असल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. आज ६ मे रोजी तटकरे यांनी केलेल्या निवडणूक खर्चाची तपासणी होणार आहे. रविवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब तपासला. तेव्हा सुनील तटकरे यांच्यासह ४ उमेदवारांच्या खर्चात मोठी तफावत आढळून आली. 

त्यामुळे निवडणूक आयोगाने चारही उमेदवारांना नोटीसा पाठवल्या आहेत. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे, बहूजन वंचित आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण, पांडूरंग चौले आणि अजय उपाध्ये यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. प्रलंबित खटल्यांबाबतची माहिती कमी खप असलेल्या वर्तमान पत्रात प्रसिध्द केल्याप्रकरणी कुमुदिनी चव्हाण आणि पांडूरंग चौले यांना नोटीस बजावण्यात आली.

तर १० हजार पेक्षा कमी निवडणूक खर्च असल्याने अपक्ष उमेदवार अजय उपाध्ये यांनी देखील निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. निवडणूक खर्चाची नोंद अपूर्ण असल्याने तटकरे यांना नोटीस बजावण्यात आली. आज ६ मे रोजी तटकरे यांनी केलेल्या खर्चाची तपासणी होणार आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group