३० एप्रिल २०२४
मुंबई : राज्यात लोकसभा निवडुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईमधून उमेदवारी देण्यात आली आहे. ट्वीटरवरुन याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांच्याविरोधात कोण आव्हान देणार? याबाबत संभ्रम कायम होता. अखेर आज महायुतीकडून अमोल किर्तीकरांविरोधात रविंद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामुळे रविंद्र वायकर हे ईडीच्या रडारवर होते.
त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच रविंद्र वायकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. वायकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार, याबाबत चर्चाही सुरू होत्या. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Copyright ©2024 Bhramar