विधानसभेच्या दोन आमदारांचे राजीनामे, चार आमदारही राजीनाम्याच्या तयारीत
विधानसभेच्या दोन आमदारांचे राजीनामे, चार आमदारही राजीनाम्याच्या तयारीत
img
दैनिक भ्रमर

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील 4 ते 5 महिन्यात होणार आहे. त्यामुळे, सर्वांनाच विधानसभा निवडणुकांचे वेधलागले असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांचा फोकस विधानसभेकडे आहे.


लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेले 48 खासदार आता दिल्ली दरबारी आपला आवाज बुलंद करणार आहेत.18 व्या लोकसभा निवडणुकीत मराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर, महायुतीचे 17 उमेदवार विजयी झाले आहे.सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला असून कॅाग्रेसला आपला पाठिंबाही जाहीर केला आहे. 


त्यामुळे, आता नवनिर्वाचित 48 खासदार संसदेत जाणार आहेत. मात्र, या 48 खासदारांमध्ये 7 विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे, या सर्वच आमदारांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यापैकी, 2 विधानसभा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.  


सर्वांनाच विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांचा फोकस विधानसभेकडे आहे. त्यातच, नवनिर्वाचित खासदारबनलेल्या आमदारांनी आता आपला राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. दोन विधानसभा आमदारांनी पदाचा राजीनामा दिला असूनआणखी 4 आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. 


राज्यातील 7 विद्यमान आमदारांना खासदार झाल्यामुळे 20 जूनपर्यंतआपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे, आत्तापर्यंत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व बळवंत वानखेडे यांनीविधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. अद्याप आमदार रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व मंत्रीसंदीपान भुमरे यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे, हे उर्वरीत 5 आमदारही लवकरच राजीनामा देतील, असे दिसून येते. 


राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये सोलापूर दक्षिणच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापुर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्यातिकीटावर खासदार झाल्या आहेत. तर, बळवंत वानखेडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते, त्यांनी अमरावती लोकसभामतदारसंघातून 19731 मतांनी नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, हे दोन्ही आमदार आता खासदार बनून दिल्लीत जातआहेत.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group