"पुरुष असताना घर एक असतं, पण स्त्रियांच्या हट्टाने....." ; अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
img
Dipali Ghadwaje
पुणे :  राज्याच्या राजकारणात पवारांचे मातब्बर घराणे म्हणून ओळखले जाते.  राजकारणात घराण्याच्या तीन ते चार पिढ्या उतरल्या. पण घर अभेद्य होते. मात्र अजित पवारांनी  वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यामुळे  हे घर अजित पवारांच्या बंडामुळे फुटले असे म्हटले जातेदरम्यान पहिल्यांदाच अजित पवारांनी कुटुंबात पडलेल्या फुटीला कोण जबाबदार आहे यावर भाष्य केले आहे.  

हे सुद्धा वाचा >>>> "या" कारणातून 6 वर्षाच्या चिमुकल्याला छताला उलटे टांगत बापाकडून मारहाण

काय म्हणाले अजित पवार? 

अजित पवार म्हणाले,  सध्या राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले आहेत.   आतापर्यंत तुम्हाला कधी त्रास झाला नाही कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. मात्र आता काय झाले दोन पक्ष झाले आहेत. सध्या दोन्ही बाजूंची पवार मंडळी सगळ्यांना येऊन भेटायला लागली, सगळ्यांची विचारपूस करायले लागले... कधी न दिसणारे आता घरी येऊन साड्या द्यायला लागले, स्टीलची घमेले द्यायला लागले, स्टीलचे डबे द्यायला लागले.. एकीने केले की दुसरी लगेच हट्टाला पेटती लगेच ती करते..  ते म्हणतात ना  पुरुष मंडळी आहेत तोपर्यंत घर एक असते, पण एकदा का काही... सध्या नवरात्र आहे. स्त्रीशक्तीचा आदर केला पाहिजे. 

शरद पवारांचं बोट धरून अजित पवार राजकारणात आले, मात्र आता अजित पवारांनी काकांची साथ सोडली. ज्या शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात तयार केलं, या अजित पवारांनी काकांची साथ सोडली.हे पवार कुटुंबातील अनेकांना रुचले नाही. या संदर्भात श्रीनिवास पवारांनी भूमीका देखील स्पष्ट केली. पुरुष असताना घर एक असतं, पण... त्यानंतर अजित पवारांनी आपले वाक्य अपूर्ण ठेवेले.  अजित पवार हे कायम त्यांच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. मात्र यावेळी भाषणात अजित पवारांनी ओठांपर्यंत आलेले शब्द गिळले,  अजित पवारांचा  रोख नेमका कुणाकडे?  असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित होतो. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group