"या" कारणातून 6 वर्षाच्या चिमुकल्याला छताला उलटे टांगत बापाकडून मारहाण
img
दैनिक भ्रमर
येवला (दिपक सोनवणे) :- आजारी असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याला छताला उलटे टांगत मारहाण केल्याची धक्कादायक घटना चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथे घडली आहे.

या घटने विरोधात सहा वर्षांच्या चिमुकल्याच्या आईच्या फिर्यादीवरून वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली. आजारी असलेल्या या सहा वर्षाच्या चिमुकल्याला दवाखान्यात नेत औषध उपचारासाठी जास्त खर्च येत असल्याच्या रागापोटी सहा वर्षाच्या चिमुकल्याला छाताला उलटे टांगले.

पती मंगेश नंदू बेंडकुळे याला पत्नीने विरोध केला असतात दोघात भांडण झाल्याने चिमुकल्याला व पत्नीला मंगेशने मारहाण केली.

नक्की वाचा >>>> अजितदादांना धक्क्यामागून धक्के : आणखी एका नेत्याने अजितदादांची साथ सोडली
इतर बातम्या
Join Whatsapp Group