महाराष्ट्रातील 'या' गावात अद्याप एकही मतदान नाही ; नेमकं काय कारण?
महाराष्ट्रातील 'या' गावात अद्याप एकही मतदान नाही ; नेमकं काय कारण?
img
DB
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडते आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे काही मतदान केंद्रावर ही परिस्थिती असताना , दुसरीकडे काही मतदार केंद्रावर एकही मतदान झाले नाही.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या रामनगर येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र एकही ग्रामस्थ मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आला नाही. रामनगर हे पुनर्वाचित गावठाण असून 26 वर्ष झाले या गावाला स्मशानभूमी नाही, दफनभूमी नाही, रेकॉर्डला सगळे सुख सुविधा उपलब्ध आहे. नगररचनेप्रमाणे प्लॉट स्मशानभूमी दफनभूमी गावाच्या ताब्यात देण्यात यावी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान गावात पायाभूत सुविधा नसल्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group