भर सभेत सगळं सांगितलं , भाजप उमेदवाराला प्रचारसभेतच रडू कोसळले?
भर सभेत सगळं सांगितलं , भाजप उमेदवाराला प्रचारसभेतच रडू कोसळले?
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी नात्यांमध्ये लढत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदार संघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण त्या ठिकाणी पती आणि पत्नीमध्ये लढत होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी आणि शिवसेना उमेदवार संजना जाधव आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत होत आहे.

दरम्यान  संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना प्रचारसभेत बोलताना अश्रू अनावर झाले. यावेळी संजना जाधव यांनी त्यांचे पती हर्षवर्धन जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. 

कन्नडमधील एका गावात भाषणात त्यांनी नवऱ्याकडून काय सोसले हे सांगितले. त्यावेळी त्यांना रडू कोसळले. संजना जाधव या भाजप नेते रावसाहेब दानवे यांची ती मुलगी आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्न केल्यानंतर काय काय सोसले? हे सांगायला त्यांनी सुरुवात करताच डोळ्यातून पाणी आले. त्यांना थोडा वेळ भाषण थांबावावे लागलं. संजना जाधव यांना रडू कोसळले.

काय म्हणाल्या संजना जाधव? 

मी गावात सून म्हणून आले. परंतु गावाने मुलीसारखे प्रेम दिले. माझ्यावर अनेक संकटे आणि माझ्यावर अनेक अत्याचार झाले, पण मी बोलून दाखवले नाही. कारण ती आपली संस्कृती नाही. मी लग्न होऊन एका महिन्यात आल्यावर वडिलांना सर्व सांगितले. परंतु वडील म्हणाले, मुल झाले की हा व्यक्ती सुधारेल. परंतु सुधारणा झाली नाही. त्यानंतर वडील म्हणत होते, ४० झाली की हा व्यक्ती सुधरेल. परंतु तो व्यक्ती सुधारला नाही. माझ्या ठिकाणी कोणास आणले, हे तुम्हाला माहीत आहे. माझी जागा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण ती जागा घेता आला नाही, असे सांगताना संजना जाधव यांना रडू कोसळले. एका मुलीच्या बापने हे सर्व सहन केले. परंतु मुलाचा बाप असता तर तो रस्त्यावर उतरला असता
 
माझ्यावर वडिलांवर अनेक आरोप झाले. परंतु वडील शांत राहिले. कारण वडिलांना माहीत होते आपली मुलगी त्या ठिकाणी नांदत आहे. आता माझ्यावर ते घाणेरडी भाषा वापरत आहे. मी संघर्ष करत आहे. परंतु माझी संघर्ष करण्याची ताकद आता संपली आहे. आपण मला या संघर्षातून बाहेर काढा. माझ्या भावना दाटून आल्या आहेत, त्यामुळे मला जास्त बोलता येत नाही असेही यावेळी संजना जाधव म्हणाल्या  .

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group