बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान ;  निकालाची तारीखही आली समोर
बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान ; निकालाची तारीखही आली समोर
img
Dipali Ghadwaje
बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान ;  निकालाची तारीखही आली समोर

देशातील लोकसभा निवडणुकी नंतर अवघ्या देशाचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागलं होतं. अखेर या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकारपरिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे.

 येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

  • असं असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक -

    • निवडणुकीचं नोटिफिकेशन :  22 ऑक्टोबर 2024
    • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 
    • अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
    • अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 
    • मतदान  : 20 नोव्हेंबर 2024
    • मतमोजणी : 23 नोव्हेंबर  2024

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत असल्याने दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर ही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक यंदा एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत



इतर बातम्या
Join Whatsapp Group