निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगतापांची जीभ घसरली ; म्हणाले,
निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगतापांची जीभ घसरली ; म्हणाले, "निवडणूक आयोग कुत्रा बनून ..."
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला, तीन प्रमुख घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या, मात्र दुसरीकडे महायुतीला मोठ यश मिळालं. 132 जागांवर विजय मिळून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटला 41 जागा मिळाल्या. 

आठवडाभरापूर्वी लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीने २३० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. तर विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. हा निकाल महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. तसेच त्यांच्यापैकी अनेकांकडून इव्हीएम आणि या निकालांबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार भाई जगताप यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय, असं विधान भाई जगताप यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगताप म्हणाले की, आपली लोकशाही खूप मोठी आहे. ती जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. या लोकशाहीवर जर काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर त्याचं उत्तर हे निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे.

निवडणूक आयोग तर कुत्रा आहे. पण लोकशाहीला सशक्त बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सगळ्या संस्था कुत्रा बनून नरेंद्र मोदींच्या दारासमोर बसतात, असं भाई जगताप म्हणाले.

दरम्यान, भाई जगताप यांनी केलेल्या या वक्तव्यावर टीका करण्यात येत आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही या विधानावरून भाई जगताप यांच्यावर निषाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाचाळवीरांसारखं बोलणं सुरू आहे. त्यामुळे तेच भुंकताना दिसताहेत. भुंकण्यासारखी त्यांची वक्तव्यं आहेत. 

त्यामुळे त्यांना सगळ्यांना त्यादृष्टीनं तसंच दिसणार. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षातील महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली होती.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group