उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिका-यांकडून होणा-या सततच्या बॅग तपासणीच्यावरुन टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे सिल्लोडमधील सभेला आले असता हेलिपॅड वर त्यांच्या बॅगांची तपासणी झाली नाही, यावरुन ठाकरे म्हणाले की, आज आल्यावर चुकल्या सारखं वाटलं हेलिकाॅप्टरमधून उतरताना बॅग तपासायलाच कोण आलं नाही, आपली बॅग तपासत नाही म्हणजे आपलं महत्व कमी झालं की काय असं मला वाटलं, अशी खोचक टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे सिल्लोडमधील प्रचारसभेत बोलताना म्हणाले की, बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या काळात लढा लढला पण आताही काही वेगळी परिस्थिती नाही सगळ्या यंत्रणा ज्यांच्याकडे आहेत ते अन्याय करत आहेत आपण एकजूट दाखविली आहे.
अब्दुल सत्तार यांचा उल्लेख गद्दार सत्तार असा करत उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडला लागलेला हा कलंक दूर करायचा आहे. याची मस्ती किती काळ सहन करणार. याला मंत्रीपद दिले पण हे इतके हावरट नुसते खातात असा हल्लाबोल केला.
सिल्लोडमधल्या गद्दाराने टिव्हीच्या कॅमे-यामोर सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केली. आणि तोच गद्दार काल मोदीच्या सभेला व्यासपीठावर होता मला पंतप्रधान मोदींना विचारायचं आहे की, तुम्हाला हे चालंत हेच तुमचं हिंदुत्व आहे का असा सवाल ठाकरेंनी केला.
पंतप्रधान काल सुप्रिया ताईला शिवीगाळ करणाऱ्यासाठी प्रचारासाठी आले आहे. माझी भाजपला विनंती आहे आपले मतभेद असतील तर बाजूल ठेवू आपण त्यासाठी कुणाला बोलायला लागेल तर बोलू. त्यासाठी मी बोलायला तयार आहे. पण त्याअगोदर सिल्लोडला लागलेला कलंक दूर करायचा आहे. मी भाजपच्या लोकांना सांगतोय ही संधी सोडू नका. सच्चा भाजपच्या कार्यकर्ता इथली गुंडागर्दी संपवल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
गद्दार सत्तार यांनी अनेकांचे प्लॉट बळकावले, जमिनी लुटल्या. सैनिकांचीही जमीन लुटली. यांनी गोरगरीबांची झोप उडविली आहे, आता सर्वसामान्य नागरिक एक झाला पाहिजे, तुम्ही जर सत्तेचा वापर करून गरिबांना छळत असाल तर आमची सत्ता आल्यावर तुरुंगात टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी अब्दूल सत्तार यांना दिला.