महाराष्ट्रात चार दशके राजकारण गाजवणाऱ्या बड्या नेत्याची राजकीय संन्यासाची घोषणा ; व्हिडीओ आला समोर
महाराष्ट्रात चार दशके राजकारण गाजवणाऱ्या बड्या नेत्याची राजकीय संन्यासाची घोषणा ; व्हिडीओ आला समोर
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रातील राजकारणात चार दशकांपासून कार्यरत असलेले पूर्वीश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे.

एकनाथ खडसे यांनी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच यावेळी भावनिक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल, असे म्हणत त्यांनी मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचे आवाहन केले.

काय आहे त्या व्हिडिओत

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, मी नाथाभाऊ बोलत आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. यापुढे मी निवडणूक लढवणार नाही. मी गेली अनेक वर्षे आपल्या सोबत आहे. गेली अनेक वर्षे आपण सर्वांनी मला सहकार्य केले आहे. कधी जात-धर्म न पाहता सर्वांना मदत केली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे मी पुढची निवडणूक पाहणार की नाही, हे ईश्वरच ठरवेल. परंतु आपण मला जसे सहकार्य केले, तसे सहकार्य रोहिणी खडसे यांना करावे आणि निवडून आणावे, असे भावनिक आवाहन एकनाथ खडसे यांनी केले. यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ एकनाथ खडसे यांनी शेअर केला.
 
 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group