विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. सध्या राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार असल्याचे मोठं वक्तव्य त्यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकरांचे यांनी विधानसभा निवडणूक निकालापूर्वीच मोठे संकेत दिले आहे. राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर सत्तेसोबत जाणार , असल्याचे त्यांनी सांगितले.
अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं वक्तव्य केले. 'राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याचा अंदाज देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्त्वाचं वाटतं या वक्तव्यातून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या सत्तेसोबत जाण्याच्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.