महिला कार्यकर्त्यांने अजित पवारांना विठ्ठल मूर्ती भेट देताच म्हणाले ; 'रुक्मिणीला......'
महिला कार्यकर्त्यांने अजित पवारांना विठ्ठल मूर्ती भेट देताच म्हणाले ; 'रुक्मिणीला......'
img
Dipali Ghadwaje
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. राज्यातील पहिल्याच मोठ्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पक्षाने मिळविलेल्या विजयानंतर अजित पवारांच्या चेहऱ्यावरील हसू पुन्हा खुलल्याचं निकालापासून पाहायला मिळत आहे.  अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. त्याच्या हाच हजरबबाबीपणाचा नमुना नुकताच त्यांच्या शासकीय निवासस्थानी पाहायला मिळाला.

विधानसभेतील मोठ्या विजयानंतर अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'देवगिरी' बंगल्यावर कार्यकर्त्यांची ये-जा सुरु आहे. आजही सकाळी सकाळीच कार्यकर्त्यांनी 'देवगिरी'वर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळाली. महायुतीला तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. यावेळी कार्यकर्त्याकडून पवारांना विठ्ठल मूर्तीची भेट देण्यात आली. महिलांनी अजित पवारांच्या हाती विठ्ठलाची मूर्ती दिली.
 
यावेळी अजित पवारांना आधी तुळशीच्या पानांचा भलामोठा हार घालण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांना, 'ऐ तसाच धरा हा, मी मूर्ती घेतो,' असं म्हटलं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हा हार पकडून ठेवला. मूर्ती स्वीकारताना अजित पवारांनी, 'रुक्मिणीला कुठं सोडलं?' असा प्रश्न विचारल्यावर एकच हशा पिकला. यावर मूर्ती देणाऱ्या महिलेने, 'वहिनींना द्यायची आहे. रुक्मिणी आणली आहे,' असं सांगितलं. त्यावर अजित पवारांनी, 'वहिनींना सांगा,' असं उत्तर दिलं.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group