महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं आहे तर महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे उमेदवार जवळपास 130 जागांवर आघाडीवर आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार 54 जागांवर आघाडीवर आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील जोरदार मुसंडी मारली आहे. 40 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
मात्र दुसरीकेड महाविकास आघाडीला जबर पराभवाचा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख घटक पक्ष मिळून 75 चा आकडा देखील गाठू शकलेले नाहीत. दरम्यान आता उत्सुकता निर्माण झाली आहे ती म्हणजे नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार त्याची.
दरम्यान नव्या सरकारच्या शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. वानखेडे स्डेडियम किंवा शिवाजी पार्कवर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.