विधानसभेच्या मतदानापूर्वी मुंबई पोलिसांना मोठे यश ;
विधानसभेच्या मतदानापूर्वी मुंबई पोलिसांना मोठे यश ; "या" ठिकाणाहून केली 80 कोटींची चांदी जप्त
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाची व संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे.  दरम्यान पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकांकडून राज्यभरात कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी रोकड रक्कम, सोने, चांदी आणि दारुचा साठाही जप्त करण्यात आला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून प्रचारासाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिले आहेत. मतदानाच्या चार दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एका ट्रकमधून 8,476 किलो चांदी जात होती. त्याची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे. इतक्या मोठ्या रक्कमेची चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला आहे. ही चांदी जप्त करण्यात आली आहे.

मानखुर्द पोलीस वाशी चेकनाक्यावर वाहनांची तपासणी करत आहे. या तपासणी दरम्यान शुक्रवारी रात्री एका वाहनाची तपासणी करण्यात आली. या मोठ्या ट्रकमध्ये पोलिसांना चांदी मिळाली. मोठ्या प्रमाणावर चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला. या चांदीचे वजन करण्यात आले. 8,476 किलोग्राम ही चांदी भरली. त्या चांदीची बाजारातील किंमत 80 कोटी रुपये आहे.

दरम्यान अधिकाऱ्यांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या टीमला घटनास्थळी बोलवले. आता आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. सुरुवातीच्या चौकशीत ही चांदी बेकायदेशीरपणे घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीत तिचा वापर होणार होता का? त्याची चौकशी निवडणूक आयोगाचे पथक करत आहे.
 
नागपूरमध्ये मोठी कारवाई

नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोने चांदी डायमंडचे दागिने आणि इतर साहित्य असे जवळपास 1 कोटी 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबईवरून नागपूरला पार्सल आले होते. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीसचे वरिष्ठ अधिकारी आयकर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यात आचारसंहितेचे अंमलबजावणी सुरू झाल्यापासून तर आजपावतो 4 कोटीं 20 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त अवैध दारू,मादक द्रव्य या बरोबरच इतर मुद्देमाल करण्यात आला आहे. जिल्ह्यात खाजगी बसेस, एसटी बसेस याबरोबरच इतर चार चाकी तसेच उमेदवारांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वाहनांची तपासणी केली जात आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group