मोठी बातमी : मतदान केंद्रावरच तरुण उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मोठी बातमी : मतदान केंद्रावरच तरुण उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
img
Dipali Ghadwaje
राज्यात सर्वत्र मतदानाचे वातावरण असताना बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. 

बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. यादरम्यान ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले. त्यानंतर त्यांना बीड शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलंय.  

नेमकं काय घडलं? 

बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर असताना बाळासाहेब शिंदे यांना छातीत दुखू लागले अन् चक्कर आली, त्यामुळे ते जमीनीवर कोसळले. तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मतदानावेळीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील बाळासाहेब शिंदे यांचा दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मतदान केंद्रावरच मृत्यू झाला. बीड मतदारसंघात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group