ऐन मतदानाच्या दिवशी सोलापूरमध्ये गेम पलटला आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. दक्षिण सोलापूर मध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोलापुरात काँग्रेस पक्ष अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या पाठीशी आहे. महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचा पाठिंबा अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना जाहीर केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सुशील कुमार शिंग आणि प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार रिंगणात असताना काँग्रेसने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची प्रणिती शिंदेंवर सडकून टीका केली आहे. दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी संतापले आहेत.
शरद कोळी यांची प्रणिती शिंदेंवर टीका
प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम आहे. भाजपचा प्रचार करतात आणि त्यांची भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. प्रणिती शिंदे या भाजपचा प्रचार करतात. त्यांची भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. मात्र शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे. यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही. शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला आहे, असं म्हणत शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे. आपला उमेदवार हा अमर पाटील असून त्यालाच निवडून आणायचे आहे. लोकसभेत भाजपच्या आमदारांनी मदत केल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही. शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानण्याऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ही माणसं धोकेबाज निघाली, गद्दाराकडून काय अपेक्षा करणार, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय.