विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची सभा मुंबईत पार पडली. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सभा घेतली. मात्र या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची शेवटची सभा पार पडली. मुंबईतील दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ ही सभा पार पडली. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला.
महाविकास आघाडीवाले जातीच्या नावावर लोकांना लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणापासून सावध राहा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईकरांना केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचाराच्या शेवटच्या सभेसाठी महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेते उपस्थित होते. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी दांडी मारली. नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते यात सहभागी झाले नाहीत. तसेच राष्ट्रवादीचे मुंबईतील उमेदवार सना मलिक, नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकी हे देखील अनुपस्थितीत होते. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.