गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून मोठा राडा ; पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून मोठा राडा ; पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज
img
DB
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडते आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत अशातच नांदगाव मतदार संघातील साकोरा गावामध्ये दोन अज्ञात गाड्यामध्ये मतदारांना पैसे वाटपासाठी आणल्याचा संशय आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , दोन्हीही अज्ञात वाहन पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतले असून योग्य ती तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली

परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचे लक्षात येतात पोलिसांनी अतिरिक्त फौज मागवत लाठी चार्ज करत परिस्थिती परिस्थिती नियंत्रणात आणली असून कुणीही कायदा हातात घेऊन ये कायदा हातात घेतल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील विक्रम देशमाने यांनी यावेळी दिला
इतर बातम्या
Join Whatsapp Group