ह्रदयद्रावक !
ह्रदयद्रावक ! "....म्हणून PSI ने उचललं टोकाचं पाऊल ; गळफास घेऊन संपवले जीवन
img
Dipali Ghadwaje
पालघर :  विरारच्या अर्नाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रतिकांत भद्रेशेट्टे (वय 35) यांनी बोळीज येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

आपल्या राहत्या घरच्या छताच्या हुकला चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
विरारच्या अर्नाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रतिकांत भद्रेशेट्टे हे मागील चार ते पाच महिन्यांपासून नैराश्यात होते. त्यांच्या कुटुंबात एकामागून एक दुःखाचे डोंगर कोसळत होते. कोरोना काळात आई वडिलांचं छत्र हरवलं, तर आता काही महिन्यांपूर्वीच दोन्ही भावांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे, सातत्याने येणाऱ्या दु:खाच्या घटनांनी ते नैराश्यात होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

मात्र, आज त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आपले जीवन संपवले. बोळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येच्या कारणांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनं त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून पोलीस दलातूनही हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पशच्यात पत्नी आणि दीड वर्षाची लहान मुलगी आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group