".... म्हणून फडणवीसांनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार" , नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान त्यापूर्वी आज महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर महायुतीची एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंद, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

महायुतीकडून राज्यपालांना पत्र दिले आहे, नवीन सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला आहे. राज्यपालांनी आम्हाला 5 तारीख 5 वाजताचा वेळ शपथविधीसाठी दिला आहे. राज्यपालांना महायुतीतल्या घटक पक्षांच्या सहीचे पत्र दिले आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या समर्थनार्थ पत्र दिले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group