उद्धव ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंचं सावध पाऊल, घेतली
उद्धव ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंचं सावध पाऊल, घेतली "ही" खबरदारी
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर, दुसरीकडे राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असतील, याचीही चर्चा सुरू झाली आहे. पक्ष फुटीनंतर आपल्याच नवनिर्वाचित आमदारांकडून उद्धव ठाकरे यांनी प्रतित्रज्ञापत्र भरून घेतल्याची चर्चा सुरू असताना आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

शिवसनेतील बंडाच्या केंद्रस्थानी राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सध्या प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकत आहे. ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. पक्षात पक्षातील मुख्यनेते यांचा निर्णय अंतिम राहणार असून या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना शिंदे आणि भाजपकडून रस्सीखेच सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रतिज्ञापत्राला महत्त्व आले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. तर, आणखी पाच अपक्ष आणि लहान घटक पक्षांच्या आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडूनही अपक्ष आमदार गळाला लावण्यास सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सावधगिरी बाळगताना दिसत आहेत.

शिंदेंनी आमदारांकडून घेतले प्रतिज्ञापत्र…

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. आमदारांच्या जोरावर त्यांनी शिवसेना हा अधिकृत पक्ष, निवडणूक चिन्ह स्वत:कडे घेतले. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री शिंदे हे जपून पावले टाकत आहे. ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. पक्षात पक्षातील मुख्य नेते यांचा निर्णय अंतिम राहणार असून या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असणार आहेत. पक्षातील सर्व नियम व अटी त्याचबरोबर पक्ष शिस्तीचे पालन केले जाईल असा आशय या प्रतिज्ञा पत्रात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भविष्यात उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना ज्या गोष्टी घडल्या, त्या पुन्हा घडू नये यासाठी शिंदे खबरदारी घेत असल्याची चर्चा आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group