पुण्यात दारू पिऊन गाडी चालवण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत एका चालकाने नाकाबंदी करणाऱ्या महिला पोलिसाला उडवल्याचा प्रकार घडलाय. पुण्यातील मिल्स परिसरात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नायडू लेन रुबी हॉस्पिटल कडून आरटीओच्या दिशेने जाताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दीपमाला राजू नायर असे जखमी महिला पोलिसाचे नाव आहे. या महिला कॉन्स्टेबलला नाकेबंदी करताना गाडीने उडवल्याच समोर आले आहे. पुण्यातील मिल्स परिसरातील पबमधून बाहेर पडलेल्या एका भरधाव वाहनाने महिला पोलिसाला चिरडल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.
बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. रविवारी मध्यरात्री दीड वाजता भरधाव वेगात आलेल्या कारचालकाने नाकाबंदी दरम्यान रस्त्यावर उभे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले. गंभीर जखमी झालेल्या या महिला कर्मचाऱ्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.