महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं असून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिला कल हाती आला आहे. आज कोण विजयी गुलाल उधळणार? हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. राज्यात जनतेच्या मनातील सरकार कोणाचे याचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. पहिल्या फेरीपासून महायुतीने मोठी आघाडी घेतली.
राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येणार की मविआ मोठा धक्का देणार हेही लवकरच समजेल.
छगन भुजबळ पिछाडीवर, शरद पवार गटाचा उमेदवार आघाडीवर
येवल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे पहिल्या फेरीत पिछाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे असून ते आघाडीवर आहेत.
फेरी – पहिली
मतदारसंघ – येवला
आघाडी उमेदवार – माणिकराव शिंदे,शरद पवार राष्ट्रवादी
पिछाडी उमेदवार – छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार
छगन भुजबळ 115 मतांनी पिछाडीवर
कोल्हापुरात 10 पैकी 8 जागांवर महायुती आघाडीवर, मविआचे दोनच उमेदवार पुढे
कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंत महायुतीला कौल, महायुतीचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर
महाविकास आघाडीचे केवळ दोन मतदारसंघातील उमेदवार आघाडीवर
कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 3246 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
राधानगरी मधून प्रकाश अबिटकर 8000 आघाडीवर (सहावी फेरी)
कागलमधून हसन मुश्रीफ 4095 मतांनी आघाडीवर (आठवी फेरी)
इचलकरंजी मधून राहुल आवाडे 15776 मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी )
कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 8260 मतांनी आघाडीवर (सातवी फेरी )
शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 15781 मतांनी (पाचवी फेरी)
शाहूवाडी सत्यजित पाटील 926 आघाडीवर (पाचवी फेरी)
चंदगडमधून शिवाजी पाटील 5700 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
करवीरमधून चंद्रदिप नरके 8374 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
हातकणंगले मधून अशोकराव माने 9500 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
अमित ठाकरे पिछाडीवर, ठाकरे गटाचा उमेदवार आघाडीवर
माहिम विधानसभा मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे पिछाडीवर असून शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर आहेत. माहिममध्ये अमित ठाकरेंना भाजपने पाठिंबा दिला होता. पण त्यांच्याविरोधात महायुतीचे सदा सरवणकर हे मैदानात होते.
मनसे, अमित ठाकरे -३४४३
युबीटी- महेश सावंत- ५६९२
सदा सरवणकर- ४०३०
रोहित पवार पिछाडीवर, भाजपच्या राम शिंदेंना आघाडी
कर्जत जामखेड मतदारसंघात तिसऱ्या फेरीत भाजपाचे उमेदवार राम शिंदे 1551 आघाडीवर तर रोहित पवार
बारामतीत अजितदादा दुप्पट मतांनी आघाडीवर, युगेंद्र पवार पिछाडीवर
बारामती विधानसभा मतदारसंघ –
तिसऱ्या फेरीमध्ये बारामतीत अजित पवार 11171 मतांनी आघाडीवर
अजित पवार 27042
यूगेद्र पवार 15871
नांदगावमध्ये भुजबळांना धक्का, शिंदेंचा शिलेदार 14 हजार मतांनी आघाडीवर
नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी तब्बल १४ हजार मतांची आघाडी घेतलीय. त्यांनी बंडखोर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ पिछाडीवर आहेत. तिसऱ्या फेरी अखेर कांदेंना ११ हजार मतांची आघाडी होती.
नांदगावं तिसरी फेरी
सुहास कांदे :-21469
समीर भुजबळ :-9694
कांदे लीड :-11775
बच्चू कडू पिछाडीवर, भाजप उमेदवाराची आघाडी
अमरावतीत अचलपूर मतदारसंघात प्रहारचे बच्चू कडू पिछाडीवर आहेत. १४०० मतांनी बच्चू कडू पिछाडीवर असून त्यांच्याविरोधात भाजपचे प्रवीण तायडे हे आघाडीवर आहेत.
तासगाव कवठेमहाकाळमध्ये शरद पवार गटाचे रोहित पाटील आघाडीवर
सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातील पहिल्या फेरीची मतमोजणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील 300 मतांनी आघाडीवर आहेत.