राष्ट्रवादीच्या २ गटात गदारोळ, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षास मारहाण
राष्ट्रवादीच्या २ गटात गदारोळ, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षास मारहाण
img
Dipali Ghadwaje
इंदापूर :  पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत आहे.  विधानसभा निवडणुकीचं आज मतदान होत आहे. अशात ऐन मतदानाच्या दिवशी लाखेवाडी गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांना १५ ते २० जणांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली . चौघांविरुद्ध पोलीसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , हल्ल्यात जखमी झालेल्या बबन रामचंद्र खाडे (वय ७१ वर्षे, रा.लाखेवाडी, ता.इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रभाकर तुकाराम खाडे,संतोष प्रभाकर खाडे, शुक्रराज संतोष खाडे,धनराज प्रदीप खाडे ( सर्व रा. लाखेवाडी, ता.इंदापूर) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी खाडे निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. लाखेवाडी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून काम पहातात. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर चाललेली भांडणे मिटवली. त्याचा राग मनात धरुन उपरोक्त आरोपींपैकी संतोष खाडे याने त्यांना दगड फेकून मारला. इतरांनी लाथाबुक्क्या व काठीने मारहाण केली. त्यामुळे त्यांना डोक्याला व तोंडाला मार लागला, असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान आरोपी हे हर्षवर्धन पाटील गटाचे आहेत. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कायद्याचा भंग करत व घाबरवून लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. लाखेवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बबन खाडे यांनी अशा प्रकारच्या घटनांविरोधात आवाज उठवल्याने त्यांना मारहाण झाल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group