२० नोव्हेंबर २०२४
राज्यभरात आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी मतदार पार पडत आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. सामान्य नागरिकांसह राजकीय नेते मंडळी, अभिनय क्षेत्रातील कलाकार मंडळी देखील आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.
अशातच आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपरी पाचपाखडी मतदारसंघातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, बंधू प्रकाश शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी देखील आज ठाणे येथे मतदानाचं कर्तव्य बजावले.
यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, आजचा दिवस लोकशाहीचा उत्सव करण्याचा आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी या उत्सवात सहभागी
तसेच एकनाथ शिंदे म्हणाले की , आमच्या सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनामुळे राज्यातील अनेक आमच्या बहिणींना हातभार लागला आहे. तसेच येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात महायूतीचे आणि बहुमताचे सरकार असले असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. कारण राज्यातील जनतेने आमच्या सरकारचा अडीच वर्षातील विकास पाहीला आहे. आम्ही विकासाला प्राधान्य देत आहोत, हे जनतेला माहिती आहे.
त्यामुळे राज्यात आमचेच सरकार येईल यात कोणतीच शंका नसल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडीने थांबवलेला विकास आम्ही पुन्हा सुरू केल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
दरम्यान, ठाणे विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघातून नेमका विजय कोणाचा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Copyright ©2024 Bhramar