मोठी राजकीय बातमी! एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार ,
मोठी राजकीय बातमी! एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार , "ही" माहिती आली समोर
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात लवकरच नव्या सरकारची स्थापना होणार आहे. त्यासाठी महायुतीकडून तयारी केली जात आहे. मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.  दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदाची माळ यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान  एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला काही महत्त्वाची मंत्रि‍पदे दिली जातील. आता मुख्यमंत्रि‍पदासाठीचं नाव जवळजवळ निश्चितच झाल्यामुळे आता नव्या सरकारमध्ये कोण-कोण मंत्री असणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे. 

अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातही मंत्रि‍पदासाठी अनेक नेते लॉबिंग करत आहेत. शपथविधीसाठी आता 36 तासांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत. महत्त्वाचं खात आपल्या पदरात पडावं यासाठी शिवसेनेचे नेतेमंडळी प्रयत्न करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षातील निवडक ज्येष्ठ मंत्र्‍यांना उद्या (5 नोव्हेंबर) मुंबईत राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांमधील नाराजी टाळता यावी यासाठी मंत्रि‍पदाबाबत गुप्तता पाळली जात आहे. 

हेही वाचा >>>> मोठी बातमी! राज्यात "या" ठिकणी भूकंपाचे धक्के, पहाटे पहाटे जमीन हादरली

दरम्यान शिवसेना पक्षातून सात आमदारांची मंत्रि‍पदी वर्णी लागणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ मंत्र्‍यांना उद्या मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी एकनाथ शिंदे काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. याआधीच्या सरकारमध्ये ज्या नेत्यांना मंत्रिपद दिलं होतं, अशा तीन नेत्यांना यावेळी मंत्रिपद दिलं जाणार आहे. म्हणजेच मंत्री राहिलेल्या तीन बड्या नेत्यांचा पत्ता कट होणार आहे. त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळवीर मंत्र्‍यांना एकनाथ शिंदे नारळ देण्याची शक्यता आहे.
 
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group