महत्वाची बातमी : निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
महत्वाची बातमी : निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या  तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. सर्वांना प्रतिक्षा लागलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

दरम्यान निवडणूक आयोगाची  पत्रकार परिषद होणार असल्याने महायुतीने आपली पत्रकार परिषद रद्द केली. दुसरीकडे आचारसंहिता लागणार असल्याने मंत्रीमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस पडला आहे. त्यात आजही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याच्या काही मिनिटं आधी एकनाथ   शिंदे यांनी आणखी एक निर्णय घेतला. 

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. निवडणूक आयोगची पत्रकार परिषद होण्याच्या काही मिनिटं आधी एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी कनिष्ठ पदांवरील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 29 हजारांच्या दिवाळी बोनसची घोषणा कऱण्यात आली आहे. ही रक्कम गतवर्षीच्या तुलनेत 3 हजार जास्त आहे. किंडरगार्टन शिक्षक आणि आशा सेविकांनाही बोनस मिळणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group