"सुपारी घेतली नाही, माफी मागणार नाही" ; एकनाथ शिंदेंवरील वक्तव्यावर कुणाल कामरा ठाम
img
Dipali Ghadwaje
प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने त्याच्या मुंबईतीली एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले गेले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून कुणाल कामराच्या गाण्याने नवा वाद पेटला आहे. 

कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकात्मक गाणे तयार केल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदेंच्या शिवसैनिकांनी काल कुणार कामराचा खारमधील स्टुडिओ फोडला होता. तसेच त्याच्याविरोधात पोलिसांतही तक्रार दिली.

 कुणाल कामराने सुपारी घेऊन एकनाथ शिंदेंची बदनामी केल्याचा आरोप महायुती आणि मुख्यमंत्र्यांनी आरोप केला आहे. आरोपानंतर मी सुपारी घेतली नाही. मी माफी मागणार नाही, असं म्हणत कुणाल कामराने वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटलं.

कुणाल कामराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. कामराने सुपारी घेऊन वक्तव्य केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. त्यानंतर कुणाल कामराने प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई पोलिसांनी कुणाल कामराची फोनवरच प्राथमिक चौकशी केली. वक्तव्य मागे घेणार नसल्याचे कामराने पोलिसांना सांगितलं आहे. कोर्टाने सांगितल्यावर माफी मागेन असंही त्याने म्हटलं आहे. 'मी सुपारी घेतली नाही. बँक खाती तपासा, असं कामराने पोलिसांना सांगितलं. कामराच्या वक्तव्यानंतर पोलीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group