भाजपात पहिल्या यादीनंतर वादाचे फटाके,
भाजपात पहिल्या यादीनंतर वादाचे फटाके, "या" नेत्याच्या उमेदवारीला स्थानिकांचा विरोध ; थेट PM मोदींना पत्र
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या कुटुंबियांमध्येच तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भावाचा समावेश आहे. भाजपच्या या उमेदवारीवरुन नाराजी वर्तवण्यात येत असून आशिष शेलार यांचे बंधु विनोद शेलार यांच्या नावाला विरोध करत थेट पंतप्रधान मोदींना पत्र पाठवण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सध्या आमदार असलेल्या अनेक नेत्यांसोबतच नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळाली आहे. यात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या भावाला देखील मालाड विधानसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

मात्र ही उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता भाजपामध्येच वादाचे फटाके फुटू लागले आहेत. मालाड विधानसभेत सातत्याने बाहेरचा उमेदवार लादला जात असल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केल आहे.विनोद शेलार यांच्या उमेदवारीविरोधात आता मालाड विधानसभेतील पदाधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिले आहे. 

यामुळे विनोद शेलार यांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मालाड विधानसभेतील चार वॉर्ड अध्यक्ष यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांनी देखील पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यावेळी पक्ष मालाड विधानसभा मतदारसंघातून श्री विनोद शेलार यांना तिकीट देणार आहे. आम्हाला पक्षाचा प्रत्येक निर्णय मान्य आहे, पण आम्ही मालाडच्या जनतेत राहतो आणि त्यांच्याप्रती जबाबदार असल्याने पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला वस्तुस्थिती आणि मालाडच्या मतदारांच्या भावनांची जाणीव करून देणे हे आमचे कर्तव्य आहे गेल्या पाच टर्मपासून पक्षाने मालाड बाहेरील लोकांना विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले आहे, त्यामुळे जनतेतच नाही तर स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही असंतोष आहे. 

परिणामी आम्हाला प्रत्येक वेळी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रत्येक वेळी अस्लम शेख हे भाजपचे उमेदवार हे बाहेरचे असा मुद्दा बनवतात आणि आघाडी घेतात. त्यामुळे याबाबत विचार व्हावा, अशी मागणी या पत्रामध्ये केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group