मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच कारणामुळे राज्याच्या राजकीय पटलावर देखील मोठ्या घडामोडी घडत आहेत.
जवळजवळ सर्वच पक्षांतील आजी-माजी आमदारांची तिकीट मिळवण्यासाठी धडपड चालू आहे. नेतेमंडळी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेत आहेत. असे असतानाच आता सोलापूरच्या राजकारणात मोठ्या हालचाली होत आहे.
माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे हे राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. विशेष म्हणजे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी बबन शिंदे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. शिंदे यांच्या या भेटसत्रामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार समर्थक असलेले माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे दाखल झाले आहेत. भोसरीतील माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. बबनदादा शिंदे आणि विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र, शरद पवारांच्या भेटीला आल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. कालच राजन पाटील यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती.