महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपचं डबलसीट सरकार दाखल झाले. त्यानंतर आज दिल्लीचा आखाडा कोण गाजवणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
देशाच्या राजधानीत भाजपचे कमबॅक होणार, असा दावा एक्झिट पोलने केला आहे. तर आप सुद्धा मोठी मुसंडी मारण्याचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेसला निदान एक तरी जागा निवडून आणता येईल की नाही, हे आज स्पष्ट होईल.
त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वातील INDIA आघाडीत त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. सध्या पोस्टल मतमोजणीत भाजपने आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ आप आहे. तर काँग्रेसचा जागांचा दुष्काळ संपलेला नाही.
सध्या पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष मतमोजणीला आता सुरुवात होईल. तर सुरुवातीच्या कौलमधील 42 जागांचे कल समोर आले आहेत. त्यात 15 जागांवर आप तर 26 जागांवर भाजप आघाडीवर आहेत. काँग्रेस एका जागेवर आघाडीवर दिसत आहे. कलामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे अस्तित्व दिसत नाही. शीला दीक्षित यांच्यानंतर काँग्रेसचा दुष्काळ संपलेला नाही. त्यातच आपचे अनेक दिग्गज पिछाडीवर दिसत आहेत.