विधासभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर चंद्रपुरात महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी महायुतीचे चंद्रपूर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी भाषणादरम्यान मोठा खुलासा केला.
यावेळी त्यांनी “शिंदे सरकार स्थापन करण्यात माझं मोठं योगदान आहे “मी 2019 ला निवडून आलो. त्यावेळी मला देवेंद्र फडणवीस यांनी मला भक्कम पाठिंबा दिला होता. सरकार आले, दीड दिवस राहिले. पण यानंतरही मी सोबत राहिलो. देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग करत एकनाथ शिंदे यांना संधी दिली. त्यांनी जनहिताचे काम केले. शिंदे सरकार स्थापन करण्यात माझं योगदान आहे”, असे किशोर जोरगेवार यानी म्हटले.
ते पुढे म्हणाले “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्या मनात चंद्रपूरविषयी विकासाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. त्यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळो हीच माझी इच्छा आहे”, असे किशोर जोरगेवार यांनी सांगितले.. तसेच , देवेंद्र फडणवीसांनी यासाठी मोठा त्याग केला”, असे किशोर जोरगेवार म्हणाले.