राज्यात काल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवित यश मिळाले असून महाविकास आघाडी साठी हा निकाल धक्कादायक ठरला आहे. दरम्यान,
भाजपने तब्बल 132 जागांवर भाजपने दणदणीत विजय नोंदवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलेला एकूण 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवारयांच्या पक्षाला एकूण 41 जागांवर विजय मिळाला आहे.
दरम्यान, विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युलानुसार भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये आज तिन्ही मुख्य नेते आणि दिल्लीतील वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून बदल होऊ शकतो.