विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता लागायला काही तास बाकी असताना महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली काढलेला आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रसने आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधिमंडळात जातील.
महाराष्ट्र विधानसभेची घोषणा उद्या परवाच्या दिवसांत कधीही होऊ शकते. आचारसंहिता लागल्यावर सरकारला कोणताही निर्णय घोषणा करता येत नाही किंबहुना घोषणा करता येत नाही. त्यामुळे आचारसंहितेच्या काही तासांआधी राज्यपाल नियुक्ती आमदारांचा रखडलेला विषय महायुतीने मार्गी लावल्याचे बोलले जाते.
कोणाला संधी देण्यात आली ?
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी याना संधी देण्यात अली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तसेच भाजपकडून -चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि मुखेडचे विद्यमान आमदार तुषार राठोड