राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. “धनगर समाजाला आरक्षण दिल्यास मी महायुतीच्या सत्तेतून बाहेर पडणार” अशी प्रतिक्रिया गडचिरोलीतून येणारे आमदार आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी एका वृत्त संस्थेला दिली आहे. मंत्री धर्मराव आत्राम यांनी महायुतीच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
धर्मराव आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते अजित पवार गटात आहेत. आत्राम हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील आमदार आहेत. सध्या ते कॅबिनेट मंत्री आहेत. आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी तयार असून कुठे ना कुठे धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आत्राम असल्यात दिसत आहे.
आमदारकी घरातच राहिली पाहिजे यासाठी धर्मराव आत्राम आणि त्यांच्या मुलीचा राजकीय गेम आहे असा आरोप अमरीश राव आत्राम यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना धर्मराव आत्राम म्हणाले की, “पन्नास वर्षातून 40 वर्ष आमदारकी माझ्या घरीच राहिली. पुढे पण राजघराण्यातच आमदारकी राहणार. पुतण्याही निवडणुकीत आहे, माझी मुलगी सुद्धा निवडणुकीत आहे”