राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आहे.या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी बाजी मारली असून आता महायुती सरकारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलं आहे. दरम्यान . सध्या अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर अनेक आमदार त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांची सर्व आमदारांसोबत एक बैठक पार पडली. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार यांची एका मोठ्या पदावर वर्णी लागल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
सध्या अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर अनेक आमदार त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांची सर्व आमदारांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड करण्यात आली आहे. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदार उपस्थितीत होते. यावेळी सर्व आमदारांनी एकमताने अजित पवारांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड केली. त्यामुळे आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांंनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनरही लागले आहेत. मात्र अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे सांगितले आहे.
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे.