विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविले असून तब्बल 230 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.दरम्यान, या ऐतिहासिक विजयावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
आज महाराष्ट्रात विकासवादाचा विजय झाला आहे. आज महाराष्ट्रात सुशासनाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. आज महाराष्ट्रात खोटेपणा, धोका यांचा अत्यंत वाईटपद्धतीने पराभव झाला आहे. ज्यांनी विभाजनाचा प्रयत्न केला ते आज हारले. महाराष्ट्रात नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला आहे. महाराष्ट्राने विकसीत भारताच्या संकल्पाला आणखी मजबूत केलं आहे. आज मी भाजप आणि एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना या ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा देतो. मी एकनाथ शिंदे आमचे परममित्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं कौतुक करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
तसेच , मी महाराष्ट्रातील जनतेचे, मात भगिनींचे आणि शेतकऱ्यांचे आभार मानतो. महाराष्ट्र आता विकासाच्या वाटेवर अधिक वेगानं धावेल असं अश्वासन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.