दिल्ली दरबारी सुटला असेल का जागा वाटपाचा तिढा? महायुतीच्या बैठकीत काय ठरलं? वाचा सविस्तर
दिल्ली दरबारी सुटला असेल का जागा वाटपाचा तिढा? महायुतीच्या बैठकीत काय ठरलं? वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. 

महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 45 तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं आपल्या पहिल्या यादीत 38 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र अजूनही राज्यात काही विधानसभा मतदारसंघ असे आहेत. ज्या मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. त्या मतदारसंघावर महायुतीमधील एकापेक्षा अधिक घटक पक्षांनी दावा केला आहे. या मतदारसंघात उमेदवार ठरत  नसल्यामुळे आता हा तिढा दिल्लीच्या दरबारात सुटण्याची शक्यता आहे.

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीमध्ये अमित शाह यांनी भाजप नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही असे इच्छूक बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले अमित शाह 

मिळालेल्या माहितीनुसार ज्यांना तिकीट मिळालं नाही अशा इच्छुकांकडून होणारी बंडखोरी टाळण्यावर भाजपचा भर असणार आहे. पक्षातील बंडखोरी टाळण्यावर भाजप नेत्यांनी भर द्यावा.. नाराज उमेदवारांची तुम्ही सगळ्या प्रकारे समजूत काढा , राज्यात महायुतीच सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा, त्यासाठी मतांची विभागणी आणि बंडखोरी रोखा, बंडखोरी रोखण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न करा. बंडखोरांवर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवाव, अशा सूचना राज्यातील नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्या आहेत .

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group