मोठी बातमी: 'या' पाच राज्यांच्या आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार ...आयोगाची दुपारी पत्रकार परिषद !
मोठी बातमी: 'या' पाच राज्यांच्या आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार ...आयोगाची दुपारी पत्रकार परिषद !
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली:  येत्या काही दिवसांत ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकांसाठी कंबर कसलीये. राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाने देखील आपलं काम पूर्ण केलं आहे. निवडणूक आयोगाकडून मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची  विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग आज  दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. जरी  ही विधानसभा निवडणूक असली तरी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनलच आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून  मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाच्या निवडणुका या लोकसभेबरोबरच होणार असल्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. कारण आज दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे.  या पत्रकार परिषदेत या पाच राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. साधारण नोव्हेंबरचा दुसरा आठवडा किंवा डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांचे वेळापत्रक  काय असणार याची उत्सुकता सर्वांना आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमी तयार करणारी निवडणूक
या निवडणुका 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमी तयार करणा-या असतील त्यामुळे अतिशय रंजक निवडणूक असणार आहे. या पाच राज्यासाठी काँग्रेस, भाजप, तेलंगणा राष्ट्रीय समितीसह सर्वच पक्ष या निवडणुकीत आपली ताकद लावताना दिसणार आहेत. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group