काँग्रेसला मोठा धक्का! 'या' माजी आमदाराचा भाजपात पक्षप्रवेश
काँग्रेसला मोठा धक्का! 'या' माजी आमदाराचा भाजपात पक्षप्रवेश
img
दैनिक भ्रमर
आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षांतराचे वारे राज्यात जोरात वाहत आहे. त्यात काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात पक्षप्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आज त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी आज भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवड येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षांतरामुळे पुरंदर हवेलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

पक्षप्रवेशानंतर संजय जगताप म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि भाजपची साथ आपल्याला लाभली आहे. "जिथे विकास आहे, तिथे राजकारण नाही. इथे कोणत्याही शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन विकास होत नाही, इथे विकास होतो. या विचारामुळेच मी भाजपमध्ये आलो आहे," असे त्यांनी नमूद केले. भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपण आज प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group