भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर
img
दैनिक भ्रमर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, मला सांगण्यास आनंद होतो की एल. के. अडवाणीजींनी भारतरत्न जाहीर झाला आहे. मी अडवाणींशी बोललो आणि त्यांचं अभिनंदन केले.

अडवाणी हे या काळातील सर्वाधिक आदरणीय नेते आहेत. तळगाळातून काम सुरू करत उपपंतप्रधानपदी पोहचलेले नेतृत्व म्हणजे लालकृष्ण अडवाणी आहेत. गृहमंत्री आणि आयबी मिनिस्टर म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली.

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे राम मंदिर आंदोलनाचे प्रमुख चेहरे होते. राम मंदिर निर्माणाचं श्रेय त्यांना दिलं जातं. त्यामुळे मोदी सरकारने त्यांना त्यांच्या कार्यासाठी गिफ्ट दिल्याचं बोललं जातंय. 



इतर बातम्या
Join Whatsapp Group