दैनिक भ्रमर : आज भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडली. आगामी महापालिका निवडणुकांआधी भारतीय जनता पक्षाने महत्त्वाची घोषणा केली आहे. या बैठकीमध्ये भाजपच्या मुंबई अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून मुंबई अध्यक्षपदी आक्रमक चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.अमित साटम यांच्याकडे भाजप मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
हे ही वाचा
कोण आहेत अमित साटम?
अमित साटम हे भाजपमध्ये २००० च्या दशकापासून सक्रिय आहेत. ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक राहिले आहेत. ते मुंबईतील भाजप युवा मोर्चा आणि स्थानिक समित्यांमध्ये कार्यरत होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकी अंधेरी लढले होते, अंधेरी पश्चिम येथून ते आमदार आहेत. ते मुंबईतील ट्रॅफिक आणि सार्वजनिक वाहतूक सुधारणांसाठी ओळखले जातात. भाजपच्या माध्यमातून ते स्थानिक स्तरावर आरोग्य, शिक्षण, आणि युवा विकासाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात.