भाजपला धक्का ! ''हा'' मोठा नेता घेणार हातात तुतारी
भाजपला धक्का ! ''हा'' मोठा नेता घेणार हातात तुतारी
img
दैनिक भ्रमर
विधानसभेच्या आधी  राजकरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. अनेक बडे नेते पक्षांतर करताना दिसत आहेत .  दरम्यान असाच एक मोठा धक्का आता भाजप ला बसला आहे . 

शरद पवार गटाकडून भाजपला मोठा धक्का देण्यात आला आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील भाजप नेते, माजी आमदार बापूसाहेब पठारे हाती तुतारी घेत विधानसभा निवडणूक लढणार आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी (शनिवारी) गणेश मंडळांना भेट देत असताना बापू पठारे यांनी थेट आगामी विधानसभेसाठी आपण तुतारी हाती घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच मंडळांना तुतारीला मतदान करण्याचे आवाहनही केले.

वडगाव शेरीचे माजी आमदार, भाजप नेते बापू पठारे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणूक तुतारी चिन्हावर लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. बापू पठारे यांच्या घोषणेने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे. कारण पुण्याचे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे वडगावशेरी मतदारसंघात भाजपमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे.


वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास बापू पठारे इच्छुक आहेत. परंतु महायुतीत हा मतदारसंघ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे तेथे विद्यमान आमदार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी लढविणार आहे. ज्याचा जिथे विद्यमान आमदार, त्याला तिथे तिकीट असे महायुतीचे सूत्र ठरले असल्याने भाजपमध्ये राहिलो तर आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे निश्चित होताच बापू पठाणे यांनी बाजू पलटली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group