पंतप्रधानांचे देशवासीयांना खुले पत्र
पंतप्रधानांचे देशवासीयांना खुले पत्र
img
दैनिक भ्रमर
नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक खुले पत्र लिहिले आहे. ‌‘मेरे प्रिय परिवारजन' असे म्हणत मोदींनी पत्रामध्ये विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लोकांकडून मते मागविली आहेत

पत्रामध्ये मोदी म्हणतात, माझ्या आणि तुमच्या नात्याला एक दशक पूर्ण झाले आहे. तुमचे सहकार्य आम्हाला कायम मिळणार, असा मला विश्वास आहे. राष्ट्र निर्माणासाठी आम्ही सातत्याने कष्ट घेत आहोत, ही मोदींची गॅरंटी आहे.


मोदींनी पत्रामध्ये लिहिले आहे की, देशातल्या 140 कोटी कुटुंबियांचा विश्वास, समर्थन यामुळे निर्माण झालेले नाते विशेष आहे. या नात्याला शब्दांमध्ये व्यक्त करणे अवघड आहे. देशातील कुटुंबियांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणे, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. शेतकरी, गरीब, युवक आणि महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आमच्या सरकारने इमानदारीने काम केले आहे. त्याचे परिणाम आज देशाला दिसून येत आहेत. त्यांनी पत्रामध्ये जीएसटी, कलम 370, तीन तलाक, महिलांसाठीचे नारी शक्ती वंदन विधेयक याविषयी माहिती दिली. याशिवाय आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी लोकांकडून समर्थन आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



भाजप आणि मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंगण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारचा विकासाचा अजेंडा आणि 2047 पर्यंत विकसित भारताचा दावा हा भाजपचा निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरुनच पंतप्रधानांनी थेट लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. पंतप्रधानांनी पत्रामध्ये शेवटी म्हटले आहे की, लोकशाहीचे सौंदर्य हे लोकसहभागात आहे. देशहितासाठी मोठे निर्णय घेणे, मोठ्या योजना बनवणे आणि त्या लागू करणे लोकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. मला तुमच्या सहकार्याची आणि सूचनांची नितांत गरज आहे. मला विश्वास आहे की, तुमची साथ मला मिळणारच आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group