एका वृत्तवाहिनीच्या मेगा इव्हेटला शुक्रवारी नवी दिल्लीत सुरुवात झाली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच गेल्या काही वर्षांत भारताने केलेल्या गौरवशाली कामगिरीचा उल्लेख केला.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?
आज जगाची नजर भारतावर आहे. आपल्या देशावर आहे. जगात तुम्ही कोणत्याही देशात जा, तिथले लोक भारताबाबत उत्सुक असतात. त्यांना भारताबद्दल कुतूहल असते.
भारताने गेल्या अकरा वर्षांत केलेल्या प्रगतीबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, जो देश ७० वर्षांत ११ व्या नंबरची अर्थव्यवस्था होता. तो गेल्या सात आठ वर्षांत पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था झाला आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) चे नवीन आकडे समोर आले आहेत.
त्यानुसार भारत जगातील एकमेव महत्वाची अर्थव्यवस्था बनला आहे. गेल्या १० वर्षांत आपल्या विकास दर (जीडीपी) दुप्पट झाला आहे. मागच्या दशकात भारताने २ लाख कोटी डॉलर आपल्या अर्थव्यस्थेत जोडले आहे, असे मोदी म्हणाले.
विकास दर वाढल्याचे काय फायदे होतात, त्याबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, जीडीपी डबल होणे म्हणजे केवळ आकडे बदलणे नाही. त्याचे परिणाम दिसत आहेत. २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. हे २५ कोटी लोक एक न्यूओ मिडल क्लासचा भाग झाले आहे. हा न्यूओ मिडल क्लास नवीन आयुष्य सुरू करत आहे. नव्या स्वप्नांना घेऊन जात आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत ते महत्वाचे योगदान देत आहे.