पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर आहेत. सोमवारी मॉस्को विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. भारत-रशियाची निकटता अमेरिका तसेच अनेक युरोपियन देशांना पचणारी नाही. त्याचवेळी रशियाच्या जवळ जाणाऱ्या चीनला सुद्धा ही गोष्ट आवडणारी नाही.
अलीकडच्या काळात रशिया आणि चीनचे संबंध सुधारले आहेत. रशिया आणि चीनमध्ये व्यापार सुद्धा वाढला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडींमुळे दोन्ही देश जवळ आले आहेत. पण यामुळे आपण भारतापेक्षा रशियासाठी अधिक जवळचे आहोत, अशी चीनची भावना झाली आहे. हा भ्रम रशियाने मोडला.
दरम्यान सोमवारी पीएम मोदी मॉस्को विमानतळावर पोहोचले, तेव्हा रशियाचे पहिले उप पंतप्रधान डेनिस मँटुरोव्ह तिथे मोदींच्या स्वागताला उपस्थित होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या स्वागतालाही रशियाचे दुसरे उप पंतप्रधान उपस्थित होते. पण डेनिस मँटुरोव्ह त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. मोदी यांच्या स्वागताला डेनिस मँटुरोव्ह यांनी उपस्थित राहण. त्यांना कारमधून हॉटेलपर्यंत नेऊन सोडणं यातून रशियासाठी भारत किती महत्त्वाचा देश आहे तो संदेश जातो.