रशिया आणि युक्रेनचे युद्ध काही थांबताना दिसत नाही. गेल्या चार वर्षांपासून दोन्ही देशांत युद्ध चालू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या प्रमुखांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. मात्र त्यांनाही यात अद्याप यश आलेले नाही.
दरम्यान, आता नव्या वर्षात रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला केला आहे. रशियान युक्रेनवर मोठे हल्ले केले आहेत. या हल्ल्यात रशियाने एकूण 293 ड्रोन आणि 18 क्षेपणास्त्रे डागली आहेत. 12 जानेवारीची रात्र आणि 13 जानेवारीची सकाळ यादरम्यान रशियाने हा हल्ला केला आहे.
रशियाकडून रात्रभर युक्रेनवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत. या हल्ल्यामुळे रशियातील अनेक इमातींचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर आता रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून हे युद्ध थांबवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचेही हा हल्ला द्योतक असल्याचे बोलले जात आहे.